नाला नसल्याने कल्याण-डोंबिवली काही भाग जलमय

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसारत पाणी साचले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

एका ठिकाणी छोट्या नाल्याच्या वरील काही भाग वाहून गेल्याने नाल्याच्या वरून पाणी वाहत आहे. हे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. तब्बल १०० कुटुंब यामुळे बाधित झाले आहे. यापैकी बरेचसे लोकं घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले आहेत.  नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने लोकांना ये जा करण्यासाठी स्थनिक नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्सी लावण्यात आली आहे रस्सीच्या आधारे येथील नागरिक ये जा करावं लागतं आहे मात्र पावसाचं जोर वाढत असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *