पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास दिल्लीला येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलीस उपायुक्त संजय भाटिया यांनी दिली आहे.
बाळावर उपचार करण्यासाठी त्याचे पालक त्याला विमानाने दिल्लीला घेऊऩ येत होते. या बाळाला हृदयासंदर्भात आजार असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला दिल्लीत आणले जात होते. मात्र विमानमध्ये अचानक या बाळाचा मृत्यू झाला. यासंदर्भात दिल्ली विमानतळ पोलीस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.