मध्यरात्रीपासून बेपत्ता असलेल्या अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. लैंगिक अत्याचाराचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काल रात्री दीड वाजता अडीच वर्षांची ही मुलगी पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झाली.

मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला.  दोन तास म्हणजेच पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि या मुलीचे आई वडील मुलीचा शोध घेत होते. त्यानंतर मिलिट्री कॅम्पची भिंत आहे, त्याच कंपाऊंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहटेच्या सुमारास सापडला. तिचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण शोधण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह औंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *