मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी विलंब

कल्याण-ठाणे मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी आणि बेलापूर-खारकोपर मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेतर्फे मरिन लाइन्स आणि माहीम स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तीन मार्गांवरील लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक : कल्याण ते ठाणे

मार्ग : अप जलद

वेळ : स.११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे अप मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार असून, ठाणे स्थानकातून पुन्हा जलद मार्गावर फेऱ्या वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

स्थानक : पनवेल ते वाशी

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : स.११.०६ ते दु. ४.०१ पर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी अप आणि डाऊन मार्गावरील लोकलफेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे-पनवेल या लोकल फेऱ्या रद्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे

स्थानक : नेरूळ-बेलापूर ते खारकोपर

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : स.११.३० ते दु. ४.३२ वा.

परिणाम : अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक : मरिन लाइन्स ते माहीम

मार्ग : डाऊन धीमा

वेळ : स.१०.३५ ते दु. ३.३५ वा.

परिणाम : ब्लॉक कालावधीत वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द होणार असून, काही विलंबाने धावतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *