खडकवासला धरण शंभर टक्के भरलं

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. तसेच धरण भरल्यामुळे मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 बुधवारी रात्री उशिरा खडकवासलाधरण शंभर टक्के भरल्याने मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री दोन वाजल्यापासून १७०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

खडकवासलापाठोपाठ पुण्यातील कळमोडी धरणही शंभर टक्के भरून वाहू लागले असून त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पिंपळगाव जोगे, घोड आणि नाझरे या धरण क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *