आणखी एका आमदाराचा राजीनामा

पाळीव कुत्रा चावल्याने लहान मुलगी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. शुक्रवारी (५ जुलै) याप्रकरणी मुलीच्या काकाने थेट पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मंगळवारी भिस्तबाग चौकामध्ये एका पाळीव कुत्र्याने दुर्गा संजय पिंगळे या लहान मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुर्गा पिंगळे गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी मुलीचे काका विजय अर्जुन पिंगळे (रा. सावेडी) यांनी शुक्रवारी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळीव कुत्र्यापासून मानवी जीवितास होणारे संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्या इतपत पुरेसा बंदोबस्त न करता हलगर्जीपणा दाखवत कुत्रा मोकळा सोडल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *