आईनं पबजी खेळू दिलं नाही; मुलानं केली आत्महत्या

‘पबजी’ या मोबाइल गेमच्या वेडापायी अनेक तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना देशभरात घडत असतानाच, पबजी खेळण्यास आईनं विरोध केल्यानं एका १७ वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरयाणातील जिंदमध्ये शनिवारी ही घटना घडली. दहावीनंतर या मुलानं शिक्षण सोडलं होतं. तो घरीच असायचा. दिवसातील बराच वेळ तो पबजी खेळायचा. शनिवारी संध्याकाळीही तो खोलीमध्ये पबजी खेळत होता. त्याच्या आईनं ते पाहिलं. तिनं त्याच्या हातातून मोबाइल हिसकावला. यानंतर रागाच्या भरात त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलाचे वडील पोलीस विभागात नोकरी करतात. दहावीनंतर मुलानं शिक्षण सोडलं होतं. मोबाइलवर नेहमी पबजी खेळत असे. त्यामुळे त्याला आम्ही नेहमी दरडावत होतो, असं वडिलांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही. मात्र, चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *