पुतण्याच्या मृत्यूनंतर चुलत्याची आत्महत्या

घनसावंगी तालुक्यातील हातडी येथील दत्ता काळे याचा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेचा धक्का बसल्याने दत्ताचे चुलते जनार्दन काळे (वय ५५) यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

या संदर्भात माहिती अशी की, दत्ता काळे हे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे पत्नीला आणण्यासाठी गेले होते. मृत्यूपूर्वी अर्धातास त्यांनी हातडी येथे फोन करुन सासरचे लोक आपल्याला कोंडून मारहाण करत आहेत, असे सांगितले. त्यानंतर दत्ताच्या पत्नीने हातडी येथे फोन करून दत्ता यांनी आत्महत्या केली असे कळवले. दरम्यान, दत्ताचे नातेवाईक तातडीने पाथरी येथे पोहोचले तेंव्हा दत्ता यांच्या अंगावर जखमा पाहून त्याला मारहाण करण्यात आली आहे, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेचा धक्का बसल्याने दत्ताचे चुलते जनार्दन काळे (वय ५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *