देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सकाळी काळे ढग गोळा झाले होते. मुसळधार पावसानंतर आता आकाश पुन्हा निरभ्र झाले आहे. गेल्या आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होती. मुंबईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज सकाळी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिण मुंबईत आज हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उपनगराच्या काही भागात चांगला पाऊस कोसळणार असल्याचेही म्हटले आहे.
