आदित्य पांचोलीवर बलात्काराचा गुन्हा

एका अभिनेत्रीवर बलात्कारकेल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली यांच्या विरोधात गुरुवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आदित्य पांचोलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आदित्य पांचोली याने गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्षभरापूर्वी केला होता. यावेळी अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून त्याआधारे सन २००४ ते २००९ या कालावधीत वारंवार अत्याचार केल्याचे अभिनेत्रीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. इतकेच नाही, तर हे फोटो आणि व्हिडीओ कुटुंबाला दाखविण्याची धमकी देऊन एक कोटीची खंडणीही मागितल्याचा आरोप तिने केला होता. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यास गेल्यावर रस्त्यात अडवून धमकाविल्याचे या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी पांचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *