गरम भाजीत पडून ३ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

गरम भाजीत पडून भाजलेल्या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना औरंगाबादच्या चिखलठाना भागातील पुष्पक गार्डन परिसरात घडली. हर्षल संतोष गाधु या चिमुकल्याचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. हर्षल हा घरात खेळत असताना आई घरकामात व्यस्त होती.

रात्रीचे जेवण बनवून आईने खाली ठेवले होते. त्याच वेळी खेळत असलेल्या हर्षलला अचानक चक्कर आली आणि तो गरम भाजीत पडला यामुळे त्याचा चेहरा, डोके, गंभीरपणे भाजले होते. त्याला तातडीने चिकलठाणा घाटी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

मात्र प्रकृती बिघडल्याने त्यास अधिक उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना चिमुकल्या हर्षलची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *