हॉटस्पॉटसाठी घेतलेला मोबाइल पळवला

नेटपॅक संपल्याने जेवणाचे ऑनलाइन बिल भरण्यासाठी ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाचा हॉटस्पॉट वापरण्यासाठी घेतलेल्या मोबाइलची चोरी केल्याचा प्रकार मिरा रोडमधील नवरत्न हॉटेलमध्ये घडला आहे. मिरा रोड पोलिस ठाण्यात ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविवारी रात्री ११.३० वाजता एक ग्राहक हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर त्याला बिल ऑनलाइन द्यायचे होते. मात्र ग्राहकाचा नेटपॅक संपल्याने हॉटेलमधील वायफायचा नंबर मागितला. मात्र वायफायची सुविधा ग्राहकांसाठी नसल्याने ग्राहकाने हॉटेल व्यवस्थापकाचा मोबाइल हॉटस्पॉट वापरण्यासाठी घेतला होता. व्यवस्थापक दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे पाहून ग्राहकाने मोबाइलच पळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *