झीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्ट चर्च शहरात आज सकाळी दोन मशीदींमध्ये अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केला आहे. या हल्ल्यात नऊ जण ठार झाले असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या बांग्लादेशी संघाला मात्र सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत काही तासांपूर्वी हा गोळीबार सुरू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या मशिदीत येत असतात. त्यामुळे मशिदीत गर्दीही झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काळे कपडे आणि हेल्मेट घालून एक अज्ञात इसम अल नूर मशिदीत शिरला. कोणालाही कळायच्या आतच त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आलेल्या बांग्लादेशचा संघ यावेळी मशिदीत हजर होता. संघातील सर्व खेळाडूंना सुरक्षित मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले.
न्यूझीलंडमध्ये ब्लॅक डे
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं जाहीर केलं आहे. हिंसेला न्यूझीलंडच्या भूमीवर थारा नाही अशा शब्दात त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
