पतीने बलात्कार केला, पत्नीनेच लग्न लावलं…

पतीने एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार केला तर त्याला वाचवण्यासाठी पत्नीने जबरदस्ती त्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मासूर तालुक्यातील हुनासीकोट गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाराजू (३२) आणि पल्लवी(२३) या दलित मुलीची काही महिन्यांपूर्वी भेट झाली. पेशाने पेंटर असलेला गंगाराजूची पल्लवीशी चांगली मैत्री झाली आणि नंतरही मैत्री प्रेमात परावर्तित झाली. काही दिवसांतच दोघांनी लग्नही केलं. लग्नानंतर काही दिवसांनी पल्लवीची १३ वर्षांची चुलत बहिण तिच्या घरी राहायला आली. गंगाराजूने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार लक्षात येताच गंगाराजूविरोधात तक्रार करण्याऐवजी पल्लवीने तिच्या बहिणीचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. हा सगळा प्रकार ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी लगेच तपास करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १३ वर्षांच्या पीडित मुलीला याबद्दल विचारलं असता तिने काहीच सांगितलं नाही. पण त्यानंतर एका काऊन्सिलरने तिची समजूत काढली आणि मग तिने सारा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तडक जाऊन गंगाराजू आणि पल्लवीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *