मालेगाव आगाराच्या मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या बसला रेणुका देवी मंदिराजवळील वळणावर अपघात झाला. बस क्रमांक (क्र एम एच ४०, वाय ५९८६) च्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडीत बसलेल्या एका प्रवाशाने प्रसंगावधान ओळखून वेगात असलेली बस थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बस पलटी होऊन बसमधील २५ शाळेतील विद्यार्थी व ५ पाच प्रवाशांना दुखापत झाली आहे. बसमधील सर्व प्रवाशी हे सौदाणे, उमराणा, मालेगाव तालुक्यातील आहेत. हा अपघात आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी झाला. अपघातग्रस्तांना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
