वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; निम्म केंद्रीय मंत्रिमंडळ एम्समध्ये

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ‘एम्स’ रुग्णालयात राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. वाजपेयी यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एम्स’ सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मेडिकल बुलेटिन जारी करणार आहे. त्यात वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबतची नवीन माहिती दिली जाणार आहे.

किडनी संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रकृतीबाबत माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *