सोन्याच्या भावात मोठी घसरण

जगभरात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याचे भाव आज कमी झाले आहेत. मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोनं 150 रुपयांनी घसरुन 31 हजार 800 रुपयांवर प्रति 10 ग्रॅम झालं आहे. चांदीचा दर मात्र 1,110 रुपयांनी वाढून 41 हजार 560 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.सिंगापूरमध्ये अमेरिका-उत्तर कोरिया यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर सकारात्मक संकेत मिळाल्याने डॉलरची मागणी मजबूत झाली. अमेरिकी फेडरल रिजर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्याने सोन्यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तारावर सिंगापूरमध्ये सोनं 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 1,297.50 डॉलर प्रति औंस झालं आहे तर दिल्लीमध्ये सोनं 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 150-150 रुपयांनी कमी झालं आहे. अनुक्रमे यांचे दर 31,800 आणि 31,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *