जेव्हा पंतप्रधान स्वतः सांडलेली कॉफी पुसतात…

आता बातमी थोडीशी आश्चर्य वाटेल अशी. ही बातमी नेदरलँडच्या पंतप्रधानांची. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रट संसदेत जात होते. जाताना त्यांच्या हातात कॉफीचा मग होता. त्यावेळी रट यांच्या हातातला कॉफीचा मग पडला आणि सगळी कॉफी सांडली. मार्क रट यांनी स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलावून त्याच्या हातातला मॉब घेतला आणि स्वतः ती कॉफी पुसली. पंतप्रधानांची ही कृती पाहून उपस्थित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. एखाद्या देशाचे पंतप्रधान स्वतः सांडलेली कॉफी पुसतात हे दृश्य भारतातल्या व्हीव्हीआयपी संस्कृतीच्या प्रेमात असणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यांच अंजन घालणारं  ठरावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *