शेवगाच्या शेंगा तोडल्याचा जाब विचारणाऱ्या वृद्धावर तलवारीने हल्ला

एकीकडे औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्राची खरेदी होते आहे तर दुसरीकडे शहरात गादिया विहार बागांमध्ये राहणाऱ्या एका ८१ वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्याचं कारण ही शुल्लक आहे.

गादिया विहारमध्ये राहणारे डॉक्टर पांडुरंग काळे यांनी आपल्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा तोडणाऱ्या एका युवकाला रागवलं होतं. याचाच राग मनात धरून त्यानं मोटर सायकलवरुन घरी जाणाऱ्या या डॉक्टरवर तलवारीने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात डॉक्टर पांडुरंग काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. काळे यांच्यावर खासगी रूग्णालयात  उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विजय साबळे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. तो डॉक्टरांच्या शेजारीच राहात होता. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *