मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.

१० भाविकांचा मृत्यू

यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील भाविक पंजाब राज्यातील होते. नांदेड येथे दर्शनासाठी जात असताना अपघात झाला.

साई भक्तांच्या बसला अपघात

जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी बसचा पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *