यवतमाळमध्ये भीषण अपघात; १० जण ठार

नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रक आणि तवेरा गाडीचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पंजाबमधील नागरिकांचा समावेश असून ते सर्वजण नांदेड येथील हुजूर साहीब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी निघाले होते.

नांदेड महामार्गावरील कोसदानी घाटामध्ये हा अपघात झाला. ट्रक आणि तवेरा गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघातामधील मृतांमध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. तर, दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *