मनसे विकणार स्वस्तात पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा गेले काही दिवस दररोज भडका उडत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून दुचाकी चालकांना पेट्रोलवर चक्क ४ रुपयांची सूट मिळणार आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करत ही माहिती दिली आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व ३६ मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोलपंपावर ही सवलत दिली जाणार आहे.

मनसे सरकारमध्ये नसूनही स्वस्तात पेट्रोल देत आहे तर केंद्र आणि राज्यातही भाजपचे सरकार असूनही त्यांना पेट्रोलचे दर का कमी करता येत नाहीत, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *