जत्रेत आकाशपाळणा कोसळून १ चिमुरडी ठार, तर ६ गंभीर जखमी

आकाशपाळण्याचा एक भाग कोसळून आंध्रप्रदेशमधील १० वर्षांची मुलगी जागीच ठार झाली तर ६ मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. उन्हाळ्यांच्या सुट्टीनिमित्त अनंतपूरमधील कॉलेजच्या मैदानात जत्रा भरली होती. रविवार असल्यानं जत्रेत मुलांची गर्दी होती. १० वर्षांच्या अमृतानं यावेळी आकाशपाळण्यात बसण्याचा हट्ट केला, पण दुर्दैवानं आकाशपाळण्यातला छोटा पाळणा खाली कोसळला आणि अमृताचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा मुलंही गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.

काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आकाशपाळण्यातील छोटा पाळणा स्क्रू ढिले झाल्यानं आधीच खिळखिळा झाला होता. स्थानिकांनी याची कल्पना आकाशपाळणा चालवणाऱ्या व्यक्तीला दिली होती. पण दारूच्या नशेत असणाऱ्या चालकानं जाणीपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर राग अनावर झालेल्या स्थानिकानं या चालकाला मारहाण केल्याचंही समजत आहे. सध्या या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *