ड्रेनेजच्या टाकीत पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळता खेळता इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. अथर्व वारंग असं मृत मुलाचं नाव आहे.

डोंबिवली येथील देसलेपाडा परिसरात ही घटना घडली. अथर्व हा काल दुपारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला असता अथर्वचा ड्रेनेजच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं.

दरम्यान, मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असून अधिक तपासणीसाठी मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *