चंद्रपुरातील आरोग्य केंद्रात आईलाच करावी लागली मुलीची प्रसूती

चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे बघायला मिळत आहे. अतिदुर्गम जिवती तालुक्यातील पाटण आरोग्य केंद्रात कर्मचारी बेपत्ता असल्याने गरोदर महिलेच्या आईनेच आरोग्य केंद्रात प्रसूती केल्याचं समोर आलं आहे. जिवती तालुक्यातील चौपनगुडा इथं ही घटना घडलीये.

या आरोग्य केंद्राला २० ते २५ गावे जोडली गेली आहे. परंतु पाटण येथील आरोग्य केंद्रात वेळेवर एकही अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने अनेकदा अशी गंभीर स्थिती उदभवत असते.

दरम्यान, आरोग्य केंद्रात गरोदर महिला आल्याची माहिती मिळताच आपण पोहचण्याचा प्रयत्न केला मात्र, वाहन उपलब्ध न झाल्याने वेळेवर पोहचू शकलो नसल्याची बाब संबंधित परिचारिकेने सांगितली. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *