८ ठार आणि ४५ जण जखमी
नांगरहार प्रांतातील एका क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेत किमान आठ जण ठार झाले.जलालाबाद भागात शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये झालेल्या काही स्फोटांमध्ये ४५ जण जखमी झाल्याची माहिती नांगरहार प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अताहुल्ला खोगयानी यांनी दिली. सामना चालू असताना हे स्फोट घडवण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू आहे, असे खोगयानी यांनी सांगितले. सध्या तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही.
