वॉर्डबॉय नसल्याने लहानग्यांनी नेला शवागृहात मृतदेह

स्ट्रेचरवर नातेवाईकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लहान मुलांनी वाहून नेला. माणुसकीचा अंत पाहणारी ही सत्यघटना सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यवक्त होतोय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातली मनाला हेलावून टाकमारी ही घटना आहे. कल्याण पश्चिमेच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० मे रोजी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला होता. मयताच्या मृतदेहाला शवागृहात नेण्यासाठी एकही वॉर्डबॉय जागेवर नसल्याने आणि उपस्थित पोलिसांनी देखील कोणतीही तसदी न घेतल्याने अखेर त्या मृतदेहासोबतच्या लहान मुलांनीच शेवटी तो मृतदेह शवागृहात नेला.

माणुसकीचा अंत 

हा संपूर्ण प्रकार एक प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. रुग्णालय प्रशासन आणि घटनास्थळी  उपस्थित पोलीस, यांची माणुसकी किती मोठी आहे याचा भांडाफोड झाला. महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्या लहान मुलांना चक्क पोलिसांच्या समोर भोगायला लागलेली अप्रत्यक्ष शिक्षा सर्वांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *