बिइंग ह्युमन! सलमानची महिलेला आर्थिक मदत

बिइंग ह्युमन’ या एनजीओच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता सलमान खान वैयक्तिक पातळीवरही अनेकांना मदत करत असतो. त्याच्या दिलदार स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका महिलेला सलमाननं मदतीचा हात दिला आहे.

बॉलिवूड हंगामा डॉटकॉमनं ही माहिती दिलीय. सलमानचा ‘दस का दम’ हा टीव्ही शो पुन्हा येत असून त्याचं शूटिंगही सुरू झालं आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर एक स्पर्धक महिला सलमानला तिच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या अडचणींबद्दल सांगत होती. त्यावेळी ती अचानक खूप भावनिक झाली आणि बेशुद्ध पडली. एक क्षण कोणालाही काही कळलं नाही. पण क्षणाचाही विलंब न करता सलमान तिच्या मदतीला धावून गेला. उपचारांसह त्याने तिला आर्थिक मदत सुद्धा केली.

त्या महिलेला पैशांची चणचण भासत होती. त्यामुळे ती तिच्या मुलाला शिकवू शकत नव्हती. या कार्यक्रमात जिंकल्यास पैसे मिळतील या आशेनेच ती त्यात सहभागी झाली होती. सलमाननं तिला मदत करून मोठा दिलासा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *