पोलीस झोपले असताना गज कापून ४ आरोपी फरार

कोल्हापूरमधल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यातून पोलीस निद्रावस्थेत असताना ४ सराईत गुन्हेगारांनी आज पहाटे पोबारा केला आहे. हे चौघंही एकाच टोळीचे असून घरफोडी केल्याप्रकरणी २० मे पर्यंत रिमांडवर होते.

सुरज डबडे( वय २२,रा. वाठार,जि. कोल्हापूर ), ओंकार सुर्यवंशी (वय १९,रा. कासेगाव,जि. सांगली) ,गोविंद माळी( वय १९, रा. कासेगाव,जि. सांगली),विराज कारंडे( वय १९,रा पाडळी दरवेज,जि.कोल्हापूर) अशी फरार झालेल्या आरोपींची नावं आहेत. या चौघांची एक टोळी असून या चौघांवर घरफोडी आणि दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद यापूर्वी देखील झाली होती.

आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान पोलिसांचे लक्ष नसताना या चौघांनी लॉकअपचे ग्रील फाकवले. त्या ग्रीलमधून बाहेर येऊन या चौघांनी पळ काढला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच एक पथक यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले . तसंच अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली .आता त्यांचा शोध लागतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *