18 वर्षाच्या पृथ्वी शॉवर फिदा झाली ही अभिनेत्री

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आयपीएलमध्ये यंदा अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हैदराबाद आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात अंडर 19 टीमचा कर्णधार पृथ्वी शॉने जबरदस्त खेळी करत अनेकांना अंचबित केलं. पृथ्वीच्या या खेळीवर एक अभिनेत्री फिदा झाली. मैदानावर खास पृथ्वी शॉची बॅटींग पाहण्यासाठी ती आली होती.

दिल्लीचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. पृथ्वी शॉने 36 बॉलमध्ये 65 रन केले. पृथ्वी शॉच्या बँटींगच्या दरम्यान मैदानावर अभिनेत्री दीक्षा पंत त्याच्या फोर, सिक्सवर टाळ्या वाजतांना दिसत होती. मॅचनंतर जेव्हा दीक्षाला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की, दिल्लीचा पृथ्वी शॉ तिला आवडतो. त्याची बँटींग पाहणं मला आवडतं. पृथ्वी शॉच्या या शानदार खेळीमुळे दिल्लीने 5 विकेट गमवत 163 रन केले. दिल्ली हा सामना जिंकेल असं वाटत होतं पण शेवटी युसूफ पठानने चांगली खेळी करत हैदराबादला विजयी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *