दोन दिवस कमी दाबाने पाणी

जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळ्यापूर्वी पम्पिंग स्टेशनमधील सब स्टेशनची दुरुस्तीची कामे करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा  बुधवार, ९ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवार, १० मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *