भाजपा नगरसेवकाच्या फोटोचा भारत मेट्रोमोनीकडून दुरुपयोग, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

पुण्यातील भाजपाचे नगरसेवक सम्राट अभय थोरात यांच्या व त्यांच्या पत्नीचा लग्नातील फोटो भारत मेट्रोमोनी या विवाहसंस्थेने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयाने पोलिसांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे.

नगरसेवक सम्राट थोरात यांचा विवाह 15 मे 2015 रोजी ऐश्वर्या अजय भोसले यांच्याशी झाला होता. या विवाहाच्या वेळी वधुवरांच्याकाढलेल्या फोटोची भारत मेट्रीमोनी या विवाहसंस्थेच्या संकेतस्थळाने चोरी करुन थोरात यांच्या परवानगीशिवाय तो संकेतस्थळावर अपलोड करुन प्रतिष्ठित घरांमधील मुला मुलींचे लग्न आम्ही जुळवतो हे भासविण्याकरीतात्या फोटाचा वापर केला.

हा प्रकार समोर येताच खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणी खडक पोलिसांना तात्काळ प्राथमिक चौकशी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *