उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर रविवार, ६ मे रोजी स. ११ ते दु. ४.३०दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल स. १०.५४ ते दु. ४.१९पर्यंत अप धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकापर्यंत धिम्या मार्गावर चालतील. त्यानंतर या लोकल पुन्हा ठाणे ते सीएसएमटीपर्यंत जलद मार्गावर चालतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकावर थांबतील.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल स. १०.१६ ते दु. ३.२२ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. या कालावधीत लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. त्याचप्रमाणे मेल/एक्स्प्रेस सुमारे ३० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर स. ११.४० ते दु. ४.४० आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटीपर्यंत स. ११.१० ते दु. ४.१०पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेलसाठी जाणाऱ्या लोकल स. ११.३४ ते दु. ४.४७पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरी/गोरेगावसाठी जाणाऱ्या लोकल स. ९.५६ ते दु. ४.४३ पर्यंत खंडित राहतील.

वाशी/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. ९.५३ ते दु. ३.२० आणि वांद्रे/अंधेरी/गोरेगाव ते सीएसएमटीपर्यंतच्या सेवा स. १०.४५ ते दु. ४.५८ पर्यंत खंडित राहील.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत दोन्ही स्थानकांमध्ये सर्व धिम्या लोकल या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *