आजारी पत्नीला हातगाडीवर ठेवून ९ किमी चालत रुग्णालयात घेऊन गेला पती

पत्नीचे प्राण वाचले पाहिजेत, तिला आजारातून बरे वाटले पाहिजे म्हणून तिच्या पतीने तिला हातगाडीवर ठेवले आणि ती हातगाडी ओढत तो ९ किलोमीटर चालत गेला. उत्तर प्रदेशातील कनौज गावात ही घटना घडली. माझी पत्नी आजारी आहे म्हणून मी १०८ क्रमांकावर फोन करून रूग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या गावात येण्यास त्यांनी नकार दिला. मग आजारी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मला तिला हातगाडीवर ठेवूनच पायी जावे लागले असा आरोप करण्यात आला आहे.

तर आजारी महिलेवर दुसऱ्या कोणत्या तरी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती आता तिला इथे आणले गेले आहे. आता आम्ही उपचार सुरु केले आहेत तिला लवकर बरे वाटेल आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगिले आहे. तिला हातगाडीवर ठेवून इथे आणावे लागले हे खरोखरच दुर्दैवी आहे असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तिला इथे आणण्यासाठी रुग्णवाहिका मिळायला हवी होती हेदेखील त्यांनी म्हटले आहे. या महिलेचे आणि तिच्या पतीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *