येथील वाशिष्टी नदीच्या तीरावर गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या वतीने उद्यापासून (४ मे) ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी’चे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध ऑफबीट डेस्टीनेशन्स आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी आयोजित केलेल्या ‘चला साहित्यिकांच्या गावाला’ या विशेष सहलींतर्गत कोकणाचा आगळा-वेगळा अनुभव घेण्यासाठी आलेले ३५ पर्यटक उद्घातानंतर लगेच ‘क्रोकोडाईल सफारी’चा आनंद घेणार आहेत. प्रसिद्ध कवी अशोक पाडगावकर, अरूण म्हात्रे, लेखिका आश्लेषा महाजन इत्यादींच्य त्यामध्ये समावेश आहे.
‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असून या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या देशात चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. परंतु ‘मगर’ आपल्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी क्रोकोडाईल सफारी सारखा उपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटीदरम्यान वाशिष्ठीच्या किनारयावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी ८-१० फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतील नसíगक वातावरणात पाहाता येते. चेन्नई प्रमाणे येथेही ‘क्रोकोडाईल पार्क’ची शक्यसता तपासण्याची तसेच या मगरीचा शास्त्रोक्त अभ्यास केला जाण्याची नितांत गरज आहे. सध्या येथील मगरी या पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचे काम करत आहेत. वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाईल टुरिझमचा आनंद मिळण्यासाठी संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे.
सन २०१४ पासून वर्षांतून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामातसकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून किमानसुमारे २५ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती लाभत आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, असा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. येत्या ८ मेपर्यंत चालणार्यान या महोत्सवात ‘क्रोकोडाईल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात आली असून त्यांसोबत आयलंड भेट, डॅिशग कार, अस्मानी झुले, रोइंग बोट, पॅडल बोटिंग, फनी गेम्स, फूड कोर्ट उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज किंवा (७७६७००७११०) व्यवस्थापक विश्वास पाटील (९८२३१३८५२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आहे.
