अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाचा बलात्कार

पालघर तालुक्यातील मनोर शहरात सावत्र बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे.

रमेश जान्या पवार (३८) असे आरोपीचे नाव असून, तो १२ वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वर्षभरापासून अत्याचार करत होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. अखेर आईने मुलीसह मनोर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून रमेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ३ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *