चार दिवसांत उष्णतेची लाट

पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील तापमानात गेल्या दोन दिवसात घट झाली असली, तरी पुढील येत्या २ ते ४ मे दरम्यान संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शहरात सोमवारी दिवसभरात किमान ३८.१ आणि कमाल २२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गेल्या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट आली. बरोबरीने संपूर्ण राज्यातील तापमानातही वाढ झाली. पुण्यामध्येही शनिवारी या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच ४०. ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांत शहरातील कमाल तापमानात पुन्हा घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी तापमानात घट झाली. पण, येत्या चार दिवसांत कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *