‘मृत्यूनेच तिला ओढत नेले’

घरामध्ये दोन कमोड पद्धतीची शौचालये आहेत, मात्र ती आईला वापरता यायची नाहीत, म्हणून ती या सार्वजनिक शौचालयात जायची. तिच्यासाठी घरातले एक शौचकूप आम्ही बदलणार होतो, पण त्यापूर्वीच आईचा असा दुर्देवी मृत्यू झाला…ज्यांच्या घरांमध्ये शौचालय नाहीत असे शेकडो मुंबईकर अशा प्रकारची चाळींमधील शौचालये वापरतात, त्यांची साफसफाई केली जाते, पण अंतर्गत स्वच्छतेचे काय,’ असा प्रश्न लेबूबेनचा मुलगा मनीष जेठवाने उपस्थित केला. कुणाला शब्दानेही न दुखावणाऱ्या माझ्या आईचा नियतीने असा क्रूर सूड का घ्यावा, याचे उत्तर मनीषला हवे आहे.

स्फोट झाल्यानंतर मदत मिळेपर्यंत जवळजवळ अर्धा तास गेला. एक वाजण्याच्या सुमारास टाकीत पडलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. बाबूलाल जोगाराम हे या चाळीत भाड्याने राहायचे. त्यांना चार लहान मुले आहे. रोजंदारीवर काम करून ते संसाराचा गाडा हाकायचे. वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी, राजस्थानला पाठवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *