भांडूपमध्ये शौचालय कोसळलं, दोघांचा मृत्यू

भांडूपच्या शिवाजी तलावजवळील साईसदन चाळीत सार्वजनिक शौचालय  खचून झालेल्या दुर्घटनेत दोनजण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी दोनजण अडकल्याची भीती असून अग्निशमन दलाकडून शोध मोहिम सुरू आहे.

आज पहाटे साडे सहा वाजता ही दुर्घटना घडली. भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं आणि या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला. ज्या ठिकाणी हे शौचालयं होतं तिथे मोठा खड्डा पडला आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली २ महिला आणि २ पुरुष अडकल्याने अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाने मदत कार्यास सुरुवात करून दोनजणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि पुरुषांचा समावेश असून बाबूलाल देवाशी नागूबाई जेठवा अशी त्यांची नावं आहेत. इतर दोन जणांचा अजूनही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, एनडीआरएफचं एक पथक आणि पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *