चार दिवस बँका बंद

चौथा शनिवार व रविवारला जोडून सलग दोन दिवस सार्वजनिक सुट्या आल्याने आजपासून सलग चार दिवस बँका बंद  राहणार आहेत. २८,२९,३० एप्रिल व त्यानंतर एक मे अशा सलग चार दिवस बँकांना सुटी असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. २८ एप्रिलला चौथ्या शनिवारची, २९ एप्रिलला रविवारची तर ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमेची सुटी आहे. एक मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त बँकांना सुटी असेल. व्यवहार पूर्ण करण्यासाठी गुरुवारी व शुक्रवारी अनेक बँकांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती.

चार दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना एटीएमवर अवलंबून रहावे लागणार आहे. याशिवाय, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन पेमेंट, नेटबँकिंग आदीच्या आधारेही व्यवहार करता येणे शक्य आहे. सलग चार दिवस सुट्या लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या एटीएमना पुरेशी रोकड उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न झाल्यास एटीएमवर ताण येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *