तिकिटांवर स्थानकांची नावे मराठीत

महाराष्ट्रातून  लांब पल्ल्याच्या गाडीचे अनारक्षित तिकीट किंवा मुंबईतून लोकलचे तिकिट काढल्यास त्यावर स्थानकाचे सुरुवातीचे आणि शेवटचे नाव हे मराठीत छापले जाणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

याआधी तिकिटावर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत स्थानकांची नावे छापली जात होती. स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यानुसार देशभरातील त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे स्थानिक भाषेतही छापण्यात येत आहेत. या धोरणानुसारच मध्य रेल्वेने अनारक्षित तिकिटांवर स्थानकांची नावे मराठी भाषेतही छापण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *