जि.प.शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार

प्राथमिक शिक्षकांसाठी खूषखबर आहे, यापुढे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. यापूर्वी मॅन्यूअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्याचा वरदहस्त असेल त्या शिक्षकांनाच लाभ होत असे. काही शिक्षक १५-१५ वर्षापासून दुर्गम भागात सेवा बजावत आहेत, तरीही त्यांची बदली झालेली नाही, अशा शिक्षकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. अपंग, गंभीर आजार असलेले, पती-पत्नी एकत्रीकरण हवं असलेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *