औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारात कंटेनर व पोलीस वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एका पोलीस कर्मचा-याचा हात तुटला असून बाकी किरकोळ जखमी झाले आहेत. या व्हॅनमध्ये एकूण २५ कर्मचारी होते.
केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. २५ पोलीस कर्मचा-यांना घेऊन पोलीस वाहन जळगावकडे परतत असताना सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नगरच्या दिशेने येणा-या कंटेनरने पोलीस व्हॅनला समोरून जोराची धडक दिली. जखमींवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
