महिलांची दबंगगिरी | आख्खं दारूचं दुकान रस्त्यावर फेकलं

गोंदीया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खमारी गावात दारू बंदी करण्यासाठी महिला आक्रमक झाल्या. आंदोलन करून बंद पाडलेली दुकानं पुन्हा सुरू झाल्यामुळे महिलांनी एकत्र येत दारू दुकानातले बॉक्स रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला.

बाटल्या रस्त्यावर फेकून त्यांची होळी केली. महिलांनी आंदोलन करून बंद पाडलेलं दुकान न्यायालयाच्या आदेशाने परत सुरू झालं होतं. यामुळे संतापलेल्या महिलांनी आंदोलन केलं. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पोलिसांनी आंदोलक महिलांवरच गुन्हे दाखल केल्यामुळे गावात रोष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *