इंद्राणीला फुफ्फुसात संसर्ग

शीना बोरा  हत्याप्रकरणी कैदेत असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी रात्री तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियासदृश्य चट्टा दिसून येत असून, तिला ताप येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या रुग्णांमध्ये थुंकी श्वासनलिकेत जाऊन अशाप्रकारचा चट्टा दिसून येतो, तीच लक्षणे इंद्राणीमध्ये दिसत आहेत. एक्स रे अहवालातून हे निदान झाले असून, अद्याप लघवी व पोटाच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आलेले नाहीत. इंद्राणीची प्रकृती स्थिर असली तरीही न्यूमोनियासदृश्य चट्टा जाईपर्यंत तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जे. जे.चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *