तीस जिहादी ठार

फ्रान्स आणि मालीच्या लष्करी तुकड्यांसोबत झालेल्या चकमकीत ३० जिहादी दहशतवादी ठार झाले. माली आणि नायजरच्या सीमेवर ही चकमक झाली, अशी माहिती फ्रान्सच्या लष्करातर्फे देण्यात आली. लष्कराचे प्रवक्ते कर्नल पॅट्रिक स्टेइगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाबार भागात रविवारी सुमारे ६० दहशतवाद्यांबरोबर ही चकमक झाली. त्यात मालीच्या लष्कराचे थोडेफार नुकसान झाले. मात्र, फ्रान्सच्या लष्कराचे कोणतेही नुकसान झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *