सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, कुस्तीपटू निलेश कंदूरकरचं निधन

कोल्हापूर- बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश विठ्ठल कंदूरकर याचं निधन झालं आहे. निलेशवर कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण निलेशची मृत्यूशी झुंज संपली असून शुक्रवारी पहाटे 4 वाजता निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अवघ्या १९ वर्षांच्या नीलेशचे कुस्तीवर अपार प्रेम होतं. त्यामुळे माजी कुस्तीगीर असलेले वडील विठ्ठल कंदूरकर यांनी त्याला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलात कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी घातलं. भारदस्त शरीरयष्टीचा असलेला निलेश मनमिळावू व नम्र स्वभावाचा ओळखला जायचा.

बांदेवाडी येथे एका मैदानात प्रतिस्पर्धी मल्लाने एकचाक डाव टाकताना नीलेश मानेवर पडला. त्यात त्याच्या मणक्यांना जबर मार लागला. त्यामुळे नीलेशच्या शरीराची हालचाल पूर्णपणे मंदावली. त्याला शाहूपुरी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *