शाळकरी मुलीवर बलात्कार करून गर्भपात; तिघांवर गुन्हा दाखल

बार्शी तालुक्यातील सारोळे गावाजवळ एका गरीब शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी कृष्णात रामचंद्र घाटे व त्याचा चुलत भावासह तिघाजणांविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती शाळेला जाताना-येताना तिला वाटेत कृष्णात घाटे याने फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर अधूनमधून बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांना माहीत नव्हती. परंतु जेव्हा तिने पोट दुखत असल्याची तक्रार केली, तेव्हा आईने तिला जवळच्या दवाखान्यात नेले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्याची जबाबदारी न स्वीकारता कृष्णात याने तिला बळजबरीने गर्भपात करून घेण्यास भाग पाडले. तुळजापूर येथील एका खासगी दवाखान्यात नेऊन त्याने तिचा गर्भपात केला. नंतर पुन्हा तिचे पोट दुखू लागल्यामुळे तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पीडित मुलीने कृष्णात रामचंद्र घाटे याच्यासह मारुती रामचंद्र घाटे व रविराज ऊर्फ बाळराजे घाटे या तिघाजणांविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *