कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता?

स्टँड अप कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. टेलिव्हिजनवरील बऱ्याच कॉमेडी शोमध्ये झळकलेल्या सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे. ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला.

‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सिद्धार्थच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे ही धक्कादायक माहिती दिली आहे. ‘सेल्फी मौसी अर्थात सिद्धार्थ सागर तुम्हाला आठवतोय का? गेल्या चार महिन्यांपासून तो बेपत्ता असून १८ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याला अखेरचं पाहिलं होतं. तो कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. तो माझा खूप चांगला मित्र असून त्याला शोधण्यासाठी माझी मदत करा,’ असं तिने या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. त्यासोबतच सिद्धार्थचे काही फोटोदेखील तिने पोस्ट केले आहेत.

द कपिल शर्मा शो’मध्येही सिद्धार्थ झळकला होता. ‘सेल्फी मौसी’ या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सिद्धार्थ नेमका कुठे आहे याची कोणालाच माहिती नसून त्याच्या कुटुंबीयांनीही याबाबत कोणतीच माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *