पार्सल उशीरा आलं म्हणून महिलेनं फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला सुऱ्यानं भोसकलं

फ्लिपकार्टवरून मागवलेल्या फोनची डिलिव्हरी उशीरा आली या रागातून ३० वर्षीय महिलेनं फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला सुऱ्यानं भोसकलं. या महिलनं त्याच्यावर सुऱ्यानं वार करून त्याला मरणासन्न अवस्थेत फेकून दिलं. या हल्ल्यात फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात हल्लेखोर महिला कमल दिप आणि तिच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. कमलनं काही दिवसांपूर्वी संबधित इ-कॉमर्स साईटवरून स्वत:साठी मोबाईल फोन मागवला होता. निहाल विहार परिसरात हा प्रकार घडला आहे. फोनची डिलिव्हरी उशीरा आली या कारणावरून या महिलनं गरीब डिलिव्हरी बॉयला खडे बोल सुनावले तसेच चाकूनं भोसकून त्याच्याकडून ४० हजारांची रोकडही लुटली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कमल आणि तिच्या भावानं मिळून त्या डिलिव्हरी बॉयला चंदन विहार परिसरात फेकून दिलं. महिलेच्या घराचा पत्ता सापडत नसल्यानं पार्सल पोहोचवण्यात उशीर झाल्याचं कारण त्याने सांगितलं. पण महिलेनं मात्र आपली बाजू समजून न घेता हल्ला केल्याचा आरोप त्यानं केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *